Bells Dispatched From Tamil Nadu to Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. मंदिर उभारणीचा पहिला टप्पा वेगाने पूर्ण होत आहे. दरम्यान, रविवारी तामिळनाडूतून राम मंदिरात 42 घंटा पाठवण्यात आल्या. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. ट्रकवर ठेवलेल्या मोठ्या घंटांचे वजन 2 ते 2.5 टन आहे. या घंटासोबतच इतर काही लहान घंटा देखील पाठवण्यात आल्या आहेत. राम मंदिरात घंटानाद करण्यापूर्वी त्यांची पूजा करण्यात आली. पंडितांनी पूर्ण विधीपूर्वक घंटांचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला. या वेळी सर्वसामान्यांनीही पूजा केली. तामिळनाडूत बनवलेल्या घंटा राम मंदिरात बसवल्या जाणार आहेत. यावेळी प्रभू श्री रामाच्या जय घोषात या सर्व घंटांची पूजा करण्यात आली. (हेही वाचा - Ram Temple Inauguration: अयोध्येत 22 जानेवारीला केवळ निमंत्रित आणि सरकारी ड्युटीवर असलेल्या लोकांनाच प्रवेश; हॉटेल्सचे प्री-बुकिंग होणार रद्द)
पहा व्हिडिओ -
Batch of 42 Bells dispatched from Tamil Nadu to Ayodhya Ram Mandir with chants of Jai Shree Ram. The bigger ones weigh 2 to 2.5 tons each pic.twitter.com/nvMiRTFkRe
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) December 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)