‘Chhaava’ Box Office Collection: विकी कौशलचा ऐतिहासिक 'छावा' (Chhaava) चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. 'छावा' 520 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 23 व्या दिवशी 13.70 कोटी रुपये कमावले. एकूण देशांतर्गत चित्रपटाची कमाई 516.40 कोटी रुपयांवर पोहोचली. याशिवाय, चित्रपट तेलुगू डब आवृत्ती 7 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आवृत्तीने छावाने पहिल्या दिवशी 2.63 कोटी रुपये आणि शनिवारी 3.31 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण 5.94 कोटी रुपये चित्रपटाने कमावले आहेत.
चित्रपटाचे उत्कृष्ट कथानक, दमदार अभिनय आणि भव्य सादरीकरणामुळे तो बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला आहे. येत्या काळात 'छावा' चित्रपटाचे कलेक्शन झपाट्याने वाढेल आणि लवकरच हा चित्रपट 520 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल, असा विश्लेषकांचा विश्वास आहे.
#Chhaava continues its #Blockbuster run, delivering its strongest numbers over weekends... The film witnessed a remarkable 117.46% growth on its *fourth* Saturday – an exceptional feat.#Chhaava #Telugu is also performing excellently, with Saturday [Day 2] registering a solid… pic.twitter.com/7MTVMjnfPh
— taran adarsh (@taran_adarsh) March 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)