ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष' सिनेमा अनेक कारणांवरून सध्या वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. अशामध्ये अनेकांनी 80च्या दशकात लोकांनी डोक्यावर घेतलेल्या रामानंद सागर यांच्या 'रामायण' सोबत त्याची तुलना करत कलाकृतीला न्याय कसा द्यायचा यावरून निर्मात्यांना खडसावलं होतं. आता प्रेक्षकांना या वादाच्या दरम्यान शेमारू टीव्ही ने एक चांगली बातमी दिली आहे. रामानंद सागर यांचं 'रामायण' पुन्हा टीव्ही वर दाखवलं जाणार आहे. 3 जुलै पासून संध्याकाळी 7.30 वाजता या मालिकेचे भाग प्रसारित  केले जातील. कोविड लॉकडाऊनच्या काळातही ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. नक्की वाचा: Arun Govil On Adipurush: 'रामायण'च्या 'राम'ने 'आदिपुरुष'वर काढला राग, म्हणाले- श्रद्धेशी छेडछाड योग्य नाही .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)