यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr Mohan Agashe) यांना जाहीर झाला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. यंदा या पुरस्काराचे 34 वे वर्ष आहे. डॉ. मोहन आगाशे हे अभिनेते असून त्यांनी मराठी, हिंदी क्षेत्रात दर्जेदार काम केले आहे. यापूर्वी त्यांना 1996 साली संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पहा ट्वीट
पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा, 2023 या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्याचं डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं निश्चित केलं आहे. pic.twitter.com/RLTyoH63ty
— AIR News Pune (@airnews_pune) March 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)