‘होणार सून मी या घरची’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या तेजश्री प्रधानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अहवालानुसार तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. तेजश्रीची आई गेल्या काही काळापासून आजारी होती. या आजारपणातच 16 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. तेजश्रीच्या यशामध्ये तिच्या आईचा मोठा हात होता. तेजश्री प्रधानच्या कोणत्याही कार्यक्रमाला, स्क्रीनिंगला तिची आई तिच्याबरोबर असायची. तेजश्रीने वरचेवर तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असे. तेजश्री प्रधानची आई एक सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये काम करायची. (हेही वाचा: Nana Patekar On Viral Video: सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला थप्पड मारल्याप्ररकणी नाना पाटेकर यांनी दिली प्रतिक्रिया)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)