Hee Anokhi Gaath Trailer:  श्रेयस तळपदे यांचा नवा चित्रपट 'ही अनोखी गाठ' लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ही अनोखी गाठ चित्रपटाची चर्चा सुरु होती. दरम्यान सिनेमाचं ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे. 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. या चित्रपटातं अनेक चेहरे झळकणार आहे. श्रेयस तळपदे सोबत गौरी इंगवले, ऋशी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या चित्रपटात मुख्य भुमिका आहेत. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयसांच्या चाहत्यांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे. चित्रपटात फॅमिली ड्रामा दाखवला आहे. काही दिवसांपासून सिनेमाचं पोस्टर व्हायरल झाले होते.

श्रेयस तळपदे यांनी या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल सांगितले की, सध्याच्या काळात आपण सगळेच एका निर्मळ प्रेमकथेला मुकले आहोत. प्रेमकथेतील निरागसता हरवत चालली आहे आणि अश्यावेळी महेश दादांनी मला 'ही अनोखी गाठ'ची गोष्ट ऐकवली. त्या क्षणीत मी ठरवले हा चित्रपट करायचा. मुळात महेश सर खुप निवडक सिनेमे करतात. त्यातही त्यांचे विषय वेगेळ आणि हटके असतात. त्यामुळे या चित्रपटाचा मी भाग होतोय ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.  महेश दादा आणि झी स्टुजिओसोबत काम करण्याचा अनुभव मस्त आहे. मला खात्री आहे ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांनाही आवडेल.''

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)