‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi HasyaJatra) फेम गौरव मोरे (Gaurav More)आता मराठी चित्रपटांमध्येही काम करताना दिसत आहे. ‘हवाहवाई’ या मराठी चित्रपटामध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी त्याने भरत जाधव (Bharat Jadhav) यांच्यासह एका नव्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. गौरवच्या अभिनयाची कारकिर्द सध्या बहरत आहे. यामुळे गौरवची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गौरवचे सोशल मीडियावर फॉलोवर्स वेगाने वाढत आहेत. याची चक्क इन्स्टाग्रामलाही दखल घ्यावी लागली. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटद्वारे एक खास पोस्ट शेअर केली आहे.
गौरवच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला आता ब्ल्यु मार्क मिळाला आहे. म्हणजेच त्याचं अकाऊंट आता अधिकृत झालं आहे. “अखेरीस इन्स्टाग्रामनेही माझी दखल घेतली. हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. नेहमीच मी तुमचा आभारी आहे.” असे गौरवने या पोस्ट मध्ये लिहले आहे.
पहा ट्विट -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)