Sai Lokur Pregnant News:  मराठी अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) लवकरच चाहत्यांना खुशखबर देणार आहे. सोशल मीडियावर सई लोकून नेहमीच सक्रिय असते. आता सोशल मीडीयावर तीने गरोदर (Pregnant) झाल्याची गोड बातमी चाहत्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर नवऱ्यासोबत फोटो शेअर करत तीनं आई होणार असल्याची बातमी दिली आहे. सोशल मीडीयावर या गोड बातमीने चाहत्यांनी कंमेटचा वर्षाव केला आहे.

सईने इन्सटाग्रामवर आपल्या नवऱ्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमधून सईचे बेबी बंपही दिसत आहे. हे फोटो शेअर करत सईने लिहिलं आहे. “हाताची दहा छोटी बोटं, पायाची दहा छोटी बोटं. प्रेम आणि आर्शिवादाने आमचं कुटुंब वाढत आहे. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, एक अती आनंदाची बातमी लवकरच भेटीला येणार आहे.” सई लोकूरने मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

तिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी तीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कलाकारांनी  कमेंटच्या माध्यमातून तिचं अभिनंदन  केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)