'किती गं बाई मी हुशार' म्हणत रंगभूमी गाजवलेल्या अलबत्या गलबत्या नाटकाची भूरळ लहान मुलांमध्ये प्रचंड आहे.  रत्नाकर मतकरी लिखित या नाटकामध्ये सुरूवातीला दिलीप प्रभावळकरांनी ही भुमिका साकारली त्यानंतर वैभव मांगले या भूमिकेत दिसला. नंतर वैभव मांगले या नाटकापासून दूर झाला होता पण अलबत्या गलबत्या आता मराठी रंगभूमीवरून पुन्हा रूपेरी पडद्यावर 'अलबत्या गलबत्या' येत आहे. त्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. वरूण नार्वेकर दिग्दर्शित हा सिनेमा असणार आहे. 3 डी स्वरूपात हा सिनेमा आहे. नक्की वाचा: 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या चालू प्रयोगादरम्यान वैभव मांगले स्टेजवर कोसळला; क्रांती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू .

पहा अलबत्या गलबत्या चा टीझर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)