सुकेश चंद्रशेखर हा सध्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे. अनेक टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे नाव सुकेशशी जोडले गेले आहे, मात्र बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतचे त्याचे नाते कोणापासून लपलेले नाही. गेल्या वर्षी सुकेश चंद्रशेखर आणि श्रीलंकन ​​ब्यूटी जॅकलिनचे काही अनसीन फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये दोघांमधील जवळीक दिसून आली होती. आता 'व्हॅलेंटाईन डे'ला सुकेश चंद्रशेखरने फिल्मी स्टाईलमध्ये जॅकलीनला शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेश चंद्रशेखर कोर्ट रूममधून बाहेर आल्यानंतर त्याला जॅकलिन फर्नांडिसने केलेल्या आरोपावर विचारले असता, त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि सांगितले की, जॅकलिनला माझ्याकडून 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा द्या. सुकेशचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)