Sam Bahadur Teaser: सॅम बहादूर हा चित्रपट सद्या चर्चेत आहे. या चित्रपटात विकी कौशल हा नव्या अवतारात दिसणार आहे. काल  विकी कौशलने सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं होत. 'राझी' या चित्रपटानंतर मेघना आणि विकीचा हा दुसरा चित्रपट आहे. मेघना गुलझार हिनं हा चित्रपट दिग्दर्शन केले आहे. 'सॅम बहादूर'मध्ये, विकी भारतातील एक महान युद्ध नायक, सॅम माणेकशॉ यांचे जीवनावर आधारित कथा पडद्यावर आणणार आहे.'सॅम बहादूर'ची कथा भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी 1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय सैन्याला विजय मिळवून दिला, ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. हा चित्रपट डिसेंबरच्या 1 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकीच्या चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)