माहितीपट, लघुकथा आणि अॅनिमेशन चित्रपटांचा 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 29 मे ते 5 जून या कालावधीत होणार आहे. मुंबईच्या फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्समध्ये हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. आयोजित केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली. मंगळवारपासून महोत्सवाच्या प्रवेशिका खुल्या होणार आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की 1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट प्रवेशासाठी पात्र आहेत.

महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि रु. 10 लाख रोख पारितोषिक आणि विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)