बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) ने निराशाजनक सुरुवात केली आहे. 'तेजस' हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. भारतात हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. अॅडव्हान्स बुकिंगदेखील या सिनेमाचं खूप कमी झालं होतं. पहिल्या दिवशी फक्त 1.25 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला कमी बजेट असलेल्या ’12th Fail’ या सिनेमाने टक्कर देत चांगली कमाई केली आहे. ’12th Fail’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विक्रांतने शेअर केलेल्या पोस्टनुसार, चित्रपटाने 1.1 कोटी रुपये कमावले आहेत.
पाहा पोस्ट -
After a lacklustre start in the morning shows, #12thFail witnessed an upward trend during the course of the day… Evening shows saw a turnaround thanks to the strong word of mouth… Biz needs to multiply on Day 2 and 3 to cover lost ground… Fri ₹ 1.10 cr. #India biz. pic.twitter.com/NI83D3u9Db
— taran adarsh (@taran_adarsh) October 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)