अभिनेत्री-गायिका शहनाज गिल आता पुन्हा तिच्या जुन्या स्टाईलमध्ये परत येत आहे. पूर्वी नेहमी मजामस्ती करणारी शहनाज सिद्धार्थ मल्होत्राच्या मृत्यूनंतर शांत झाली होती. सोशल मीडियावरही ती अजिबात सक्रिय नव्हती. गेल्या एक वर्षात तीला फार कमी सार्वजनिक ठिकाणी पाहिले गेले आहे. पण आता शहनाजने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला तीच जुनी बबली शहनाज गिल पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सोशल मीडियावरील संगीतकार-गायक स्टार यशराज मुखातेसोबत एक गाणे गायले आहे. ‘कितना बोरिंग दिन है और कितने बोरिंग लोग हैं’, असे हे गाणे असून, हे शब्द शहनाजने बिग बॉसमध्ये वापरले होते. याच शब्दांवर यशराजने हे नवे गाणे बनवले आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)