मुंबईमधील ट्राफिक, रहदारी जगप्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये रस्ते मार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला प्रचंड वेळ लागतो व त्याचा अनुभव प्रत्येक मुंबईकर दररोज घेत असतो. अनेकदा सेलेब्जनाही अशा ट्राफिकचा फटका बसतो, अशावेळी मुंबईकरांच्या मदतीला धावून येते ती मुंबईची लोकल ट्रेन. नुकतेच सारा अली खानने वेळ वाचवण्यासाठी ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. मुंबईच्या ट्राफिकमुळे सारा अली खान व तिच्या टीमने गर्दीने भरलेल्या मुंबईच्या लोकलने प्रवास केला. यावेळी साराने मास्क घातला होता व त्यामुळे कोणीही तिला ओळखू शकले नाही. सध्या साराचा हा मुंबई लोकल ट्रेन प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)