लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 13 लोकसभा मतदारसंघांसह देशभरातल्या 111 लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार पक्षाने जाहीर केले आहेत. अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशमधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची संधी दिली आहे. यानंतर कंगनाने X वर पोस्टकरुन भाजपाचे आभार मानले.

माझा प्रिय भारत आणि भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मला नेहमीच बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे, आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मस्थानी हिमाचल प्रदेश, मंडी (मतदारसंघ) येथून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याचा हायकमांडचा निर्णय. अधिकृतपणे पक्षात सामील झाल्याबद्दल मला सन्मान आणि आनंद वाटतो. मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक होण्यासाठी उत्सुक आहे. असे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)