आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमार स्टारर 'रक्षा बंधन' चित्रपट 11 ऑगस्ट रोजी एकाच वेळी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. एकीकडे आमिर खानने तब्बल 4 वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये पुनरागमन केले आहे, तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' आणि 'पृथ्वीराज' या चित्रपटाच्या अपयशानंतर आता हा चित्रपटाचा चांगला परफॉर्मन्स देणार कि नाही हे बघण्यासारखे आहे. चित्रपट व्यापार तज्ञ रमेश बाला यांनी या दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाची अंदाजे आकडेवारी जाहीर करताना सांगितले, "रक्षाबंधनाला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे. पाहिल्याच दिवशी रक्षाबंधनने सुमारे ₹ 9 कोटी कमावले आहे. " दुसरीकडे, लाल सिंह चड्ढाने पहिल्या दिवशी ऑल इंडिया बॉक्स ऑफिस कलेक्शन अंदाजे ₹ 12 कोटी केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)