हृतिक रोशन (Hrithik Roshan)  आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. विक्रम वेधा या चित्रपटात दोघेही दिसणार आहेत. हृतिक गेल्या काही दिवसांपासून अबुधाबीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत होता. आता हे वेळापत्रक पूर्ण झाले आहे. हृतिक रोशनने अबुधाबीमध्ये शूटिंग पूर्ण केले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, हृतिकने चित्रपटाचा प्रमुख अॅक्शन सीन अबुधाबीमध्ये शूट केला आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022ला प्रर्दर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)