मुंबई उच्च न्यायालयाने हड्डी चित्रपट प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यातून कोणाचाच फायदा होणार नाही. हे प्रकरण पूर्णपणे आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधीत आहे. त्यामुळे त्यावरील सुनावणी कायम राहिली. पण त्याचे प्रदर्शन रोखता येणार नाही, असे म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. पुढची सुनावणी 16 ऑक्टोबरला होणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने हायकोर्टात याचिका दाखल करत 'हड्डी' चित्रपटाचे प्रदर्शनास स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. मात्र, कोर्टाने नकार दिल्याने हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या 7 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या एकल खंडपीठाने अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या वकिलामार्फत दाखल याचिकेवर सुनावणी केली.
ट्विट
Bombay High Court refuses to stay release of Hindi film ‘Haddi’
report by @Neha_Jozie https://t.co/dsSU14JS7d
— Bar & Bench (@barandbench) September 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)