शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आता आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी जावे लागणार नाही. दिल्ली एसआयटी जेव्हा जेव्हा समन्स बजावेल तेव्हा आर्यनला चौकशीसाठी टीमसमोर हजर राहावे लागेल, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

आर्यनला दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कार्यालयात हजेरी लावायची होती. त्याच्या जामीन आदेशावर लिहिलेल्या 14 अटींपैकी ही एक अट होती. ही स्थिती बदलण्यासाठी आर्यनने नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेत म्हटले आहे की, आर्यनला या अटीबाबत शिथिलता दिली जाऊ शकते, कारण क्रूझ शिप ड्रग्स प्रकरण एनसीबी दिल्लीने एसआयटीकडे सोपवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)