ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले. महाराष्ट्रातील पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात गोखले म्हणाले की, राणौत जे बोलली ते खरे आहे. यानंतर विक्रम गोखले यांच्यावर चहुबाजूने टीका व्हायला सुरुवात झाली. पद्मश्री मिळवण्यासाठी विक्रम गोखले भाजपला समर्थन करीत आहेत असेही म्हटले गेले. आता विक्रम उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत भारताच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगना रणौत गुरुवारी म्हणाली होती की, 2014 मध्ये भारताला 'खरे स्वातंत्र्य' मिळाले, जेव्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. 1947 मध्ये देशाला मिळालेले स्वातंत्र्य 'भीक' होते. या वक्तव्यानंतर कंगना राणौतवर जोरदार टीका होत आहे.
#VikramGokhale press conference tomorrow morning at 11am#KanganaRanaut
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) November 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)