शाहरुख खानला (Shah Rukh Khan) ईदच्या  (Bakari Eid) शुभेच्छा देण्यासाठी मन्नत (Mannat) बाहेर शाहरुखच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. प्रत्येक वर्षी चाहते शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मन्नतच्या बाहेर तासनतास उभे राहतात. शाहरुखही बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो. पण गेल्या वर्षी शाहरुख या शुभेच्छा स्वीकारू शकला नाही. म्हणून यावेळी चाहत्यांनी बकरी ईदचा मुहूर्त साधत मन्नतबाहेर हजेरी लावली. चाहत्याची गर्दी बघून शाहरुख खानने मन्नत बाहेर येत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम देखील त्याच्याबरोबर दिसून आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)