‘छकडा एक्सप्रेस’ (Chakda Xpress) नावाचा बॉलीवूड चित्रपट अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) जीवन आणि क्रिकेट प्रवासावर प्रकाश टाकणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुख्य भूमिकेत म्हणजेच झुलनची भूमिका साकारणार आहे. अनुष्का या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. अनुष्का झुलनप्रमाणे गोलंदाजी करण्यासाठी नेट सत्रात पोहोचली. अनुष्काने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करून चित्रपटाशी संबंधित तयारीची माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)