रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. नुकताच 1 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतर चार दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 241 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी 39.9 कोटींची कमाई केली आहे. असा एकूण पहिल्या चार दिवसात या चित्रपटाने 241.43 कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. (हेही वाचा - Dunki Trailer: शाहरुख खानच्या 'डंकी'चा ट्रेलर रिलीज, 21 तारखेला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित)
यंदाचा वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये ‘ॲनिमल’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. पठान, गदर 2 आणि टाइगर 3 चे रेकॉर्ड मोडत ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा ‘ॲनिमल’ बॉलिवूडचा जवान नंतर दुसरा चित्रपट ठरला आहे.
पाहा पोस्ट -
Box Office Report: Animal Is Unstoppable At Rs 241 Crore https://t.co/Bs7Ou0vfeA pic.twitter.com/MdIW3Bww0M
— NDTV Movies (@moviesndtv) December 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)