बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करून चाहत्यांना खूश केले होते. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांची रांग लागली आहे, ज्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. ‘ब्रह्मास्त्र’ व्यतिरिक्त आलिया ‘डार्लिंग्स’ (Darlings) नावाच्या आणखी एका चित्रपटात दिसणार असून त्याचा टीझरही आता रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीझर खूपच मजेशीर आहे. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये सस्पेन्सने भरलेली अनेक दृश्ये आहेत. या चित्रपटात आलियाशिवाय विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मॅथ्यू हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस आणि आलियाचे प्रोडक्शन हाऊस इंटरनल सनशाइन यांनी केली आहे. हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)