महाराष्ट्रात सिनेगृह खुले करण्याची घोषणा होताच अनेक बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करण्यात आल्या आहेत. संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ आता 18 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहात रिलिज होईल. आधी आलिया भट्टचा (Aliya bhatt) चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ 6 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली असून, 18 फेब्रुवारी 2022 रोजी रिलिज होणार आहे. हा एक क्राईम ड्रामा चित्रपट असणार आहे, हुसैन जैदींच्या कथेवर आधारित आहे. अजय देवगणने (Ajay Devgan) या चित्रपटात करीम लालाची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)