अखिल भारतीय हिंदू महासभेने मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्यावर बनवलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हजरतगंज कोतवाली येथे अर्ज दिला आहे. महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार भगवान श्री राम यांच्यावर बनवलेल्या आदिपुरुष चित्रपटातून सनातनींना अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात प्रभू श्री राम, सीता मैय्या, हनुमानजी यांचाही अपमान करण्यात आला आहे. चित्रपटाचे चित्रण, कलाकारांची वेशभूषा, संवाद अशा अनेक बाबतीत चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत व त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. चित्रपटाच्या आरोपी दिग्दर्शक आणि निर्मात्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल न केल्यास महासभा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही प्रवक्त्याने सांगितले.
याआधी उत्तर प्रदेशमध्ये आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय लोक दलाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. (हेही वाचा: Adipurush Dialogues Controversy: आदिपुरुष चित्रपटातील विवादास्पद संवाद बदलले जाणार; Manoj Muntashir यांची माहिती)
हिंदू महासभा ने लखनऊ में फिल्म आदिपुरुष के खिलाफ दर्ज करवाई FIR
कहा- ''पूरी स्टार कास्ट के खिलाफ मुकदमा होना चाहिए''#Adipurush #Lucknow | Adipurush pic.twitter.com/cx84R7f0nh
— News24 (@news24tvchannel) June 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)