Viral Video: 15 डिसेंबर रोजी, बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. वास्तविक धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (Dhirubhai Ambani International School) ने 15 डिसेंबर रोजी आपला वार्षिक सोहळा साजरा केला. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती लावली. कारण त्यांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. वार्षिक दिनाला बच्चन कुटुंब, शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब, करीना कपूर खान, करण जोहर, शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसह इतरांनी हजेरी लावली होती. तारांकित वार्षिक कार्यक्रमात, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सुहाना खान, करण जोहर आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी 'Deewangi Deewangi' गाण्यावर ठेवा धरला. तथापि, या कार्यक्रमात सर्वाचे लक्ष शाहरुख खानच्या अबरामने वेधून घेतले. अबरामने मनमोहक नृत्य करत सर्वांची मनं जिंकली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Most Anticipated Films in 2024: रोमान्स, कॉमेडी आणि अॅक्शनने भरलेले असले वर्ष 2024; हे 7 चित्रपट पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर धमाल करायला तयार, घ्या जाणून)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)