Adipurush: प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष हा २०२३ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून देशवासीय वाट पाहत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. चित्रपटाच्या प्रदर्शनाला जेमतेम दोन आठवडे शिल्लक असताना निर्मात्यांनी प्रमोशनचा शेवटचा टप्पा सुरू केला आहे. नुकतीच आदिपुरुष टीमने रिलीज संदर्भात एक घोषणा केली. आदिपुरुषच्या टीमने चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे आसन लोकांच्या श्रद्धेसाठी भगवान हनुमानाला समर्पित केले जाईल. (हेही वाचा - Akshay Kumar Visits Jama Masjid: शंकरा चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार दिल्लीच्या जामा मशिदीत पोहोचला (Watch Video))
#Adipurush to dedicate one seat in every Theatre to Lord #Hanuman and will be kept unsold honouring the beliefs of Lord Ram Bhakts. pic.twitter.com/tLCNZli2Rz
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) June 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)