येणारा काळ इलेक्ट्रिक कारचा आहे. जग वेगाने इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ऑटोमेकर्सनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स बाजारात आणल्या आहेत व त्याला ग्र्हकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. आता दिग्गज कंपनी फरारीदेखील या शर्यतीत सामील झाली आहे. मागील वर्षीच्या सुरुवातीला, सीईओ बेनेडेटो विग्ना (Benedetto Vigna) यांनी पुष्टी केली होती की फरारीची पहिली इलेक्ट्रिक कार 2025 मध्ये सादर केली जाईल, त्यानंतरच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये या करची पहिली डिलिव्हरी केली जाईल. आता विग्ना यांनी सांगितले की, फरारी त्याच्या पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक कारच्या विकासाला गती देण्यासाठी सामान्यतः इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चाचण्यांसाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रावर अवलंबून आहे. फरारी ईव्ही सध्या प्रोटोटाइप टप्प्यात आहे. फरारी उत्तर इटलीच्या Maranello येथे हायब्रीड आणि इलेक्ट्रिक सुपरकार बनवण्यासाठी एक नवीन कारखाना बांधत आहे, जिथे कंपनीचे मुख्यालय आहे. जून 2024 मध्ये साइट तयार होईल असे विग्ना यांनी म्हटले आहे. (हेही वाचा: Elon Musk यांच्या टेस्ला कारची भारतात लवकरच निर्मिती, PMO द्वारे सरकारी विभागांना विशेष निर्देश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)