सध्या ऑनलाईन पद्धतीने फूड डिलिव्हरी करणारे विविध अॅप लॉन्च करण्यात आले आहेत. त्यामधीलच एक झोमॅटो (Zomato) संबंधित आतापर्यंत विविध प्रकारचे मजेशीर आणि धक्कादायक किस्से समोर आले आहेत. या घडलेल्या प्रकरांवरुन ग्राहकांपासून ते नेटकऱ्यांनी झोमॅटोची खिल्ली किंवा राग व्यक्त केला आहे. तर आता सोशल मीडियावरील ट्वीटरवर एक नवीनच किस्सा खुप चर्चेत आहे. Zomato मधून ऑर्डर केलेल्या फूडची डिलिव्हरीसाठी ग्राहकाकडून संमती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून काही गोष्टीबाबत अधिक माहिती दिली जाते. त्यामुळे ग्राहकाला कोणता पदार्थ कोठून आणि कोणता व्यक्ती घेऊन येत आहे याची सुद्धा कल्पना मिळते. काही वेळेस ग्राहक डिलिव्हरी बॉयची सर्विस पाहून खुश होऊन त्यांना टिप देतात. परंतु सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या एका प्रकारामुळे नेटकरी सोशल मीडियात त्याबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
झोमॅटोची डिलिव्हरी करणाऱ्या एका बॉयला लग्नानंतर 7 वर्षात 11 मुले झाल्याचा किस्सा फार ट्रेन्डिंग होत आहे. यावर ग्राहकांनी आपली प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, या डिलिव्हरी बॉयला कंडोमची फारच गरज असून त्याने ते वापरले पाहिजे.
@Squirrel_Soul युजर्सने ट्वीटरवर त्याच्या फूडची डिलिव्हरी कन्फर्म करत त्याबाबत दाखवण्यात आलेल्या अधिक माहितीचा स्क्रिन शॉट पोस्ट केला आहे. मोहम्मद असे डिलिव्हरी बॉयचे नाव असून तो हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलू शकतो. तसेच तो दिल्लीचा असून त्याच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र आता पर्यंत त्याला 4 मुली आणि 7 मुलं आहेत.(नवी मुंबई: Zomato च्या महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप, पहा व्हिडिओ)
Hey @ZomatoIN here's adding the tip for your delivery executive mohd. "Please ask him to use condom" 😐 pic.twitter.com/HKSRxskv9G
— Squirrel_Of_Rɑm 🚩 🇮🇳 (@Squirrel_Soul) September 10, 2019
या प्रतिक्रियेनंतर युजर्स सातत्याने या प्रकाराची मजा घेत आहेत. त्यामुळेच सोशल मीडियात या प्रकाराबाबत करण्यात आलेले ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे.अनिल कांकरिया नावाच्या एका युजर्सने असे म्हटले आहे की, या व्यक्तीला नोकरीवरुन काढून टाकावे.कारण हा व्यक्ती फूड डिलिव्हरी करण्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देत आहे.
Hey @ZomatoIN here's adding the tip for your delivery executive mohd. "Please ask him to use condom" 😐 pic.twitter.com/HKSRxskv9G
— Squirrel_Of_Rɑm 🚩 🇮🇳 (@Squirrel_Soul) September 10, 2019
मोहम्मद या व्यक्तीला 7 वर्षात 11 मुले हे कसे शक्य आहे यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र डिलिव्हरी बॉयसंबंधित अधिक माहिती देत असताना त्याबाबत तांत्रिक बिघाडामुळे चुकीची माहिती कंपनीकडून देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.