Armaan Malik with his wife (PC - Facebook)

Armaan Malik Third Marriage: यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अरमान मलिकचे व्हिडिओ यूट्यूबवर खूप पसंत केले जातात. अरमानने दोन लग्न केले आहेत. यामुळे तो बराच चर्चेतही राहिला. आता पुन्हा एकदा अरमानने लग्न केले आहे आणि तिसरी पत्नीही घरी आणली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

चिरायू पायल मलिकने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक घरी असताना अरमान तिसर्‍या पत्नीसोबत घरी येतो. अरमानची तिसरी पत्नी पाहून पायलला राग येतो आणि ती कृतिकाला फोन करते. (हेही वाचा -YouTuber Armaan Malik ने गरोदर पत्नींना सोडून साधली नवीन मुलीशी जवळीक; फोटो शेअर करत म्हणाला, 'My life my Rules')

तिसरी बायको पाहून दोन्ही बायका संतापल्या -

अरमान मलिकच्या तिसऱ्या पत्नीबद्दल कळल्यानंतर कृतिका आणि पायलला खूप राग येतो. त्यांना मोठा धक्का बसतो. पायल आणि कृतिका अरमान आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीला खूप वाईट म्हणतात. व्हिडिओमध्ये कृतिका रडायला लागते. मात्र, अरमानने तिसरे लग्न केले नाही. तो फक्त पायल आणि कृतिकाती मज्जा घेत होता. या दोघींना बराच वेळ त्रास दिल्यानंतर शेवटी तो त्यांना सत्य सांगतो आणि मग कृतिका आणि पायल त्याला मिठी मारतात.

अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी आता आई होणार आहेत. दोन्ही बायका एकत्र प्रेग्नंट असताना अरमानला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. तथापि, नंतर त्याने खुलासा केला की, कृतिका नैसर्गिकरित्या आई होणार आहे. तर पायल आयव्हीएफद्वारे आई होणार आहे. पायलला एक मुलगाही आहे.