Man Sets Estranged Friend's Luxury Car On Fire: गुरुवारी मालमत्तेच्या वादातून दोन तरुणांनी ग्वाल्हेर (Gwalior) मध्ये लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान आपल्या मित्राची कार पेटवून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, कारला आग लावून दोघे पळून जात असल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या कार्यक्रमात प्रॉपर्टी डीलरच्या स्कॉर्पिओ गाडीला त्याच्याच साथीदाराने आग लावली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रॉपर्टी पार्टनर आणि त्याचा मित्र जळत्या कारजवळून पळताना दिसत आहेत. ग्वाल्हेरमधील खारिया मोदी येथील राजनंदन गार्डन परिसरात ही घटना घडली.
मुराद ठाण्याचे प्रभारी मदन मोहन मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम राठोड, एक मालमत्ता व्यवसायी आणि त्यांचे सहकारी एका लग्न समारंभाला उपस्थित होते तेव्हा ही घटना घडली. राठोड यांनी आपली स्कॉर्पिओ गाडी बागेत उभी केली आणि ते जेवायला आत गेले. काही वेळातच, लोकांनी आरडाओरडा केला आणि स्कॉर्पिओला आग लागल्याने सर्वांना सावध करण्यात आले. राठोड घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहन पूर्णपणे जळून राख झाले होते. (हेही वाचा -Tata Punch EV Bonnet Useful To Hide 'Liquor': टाटा पंच ईव्ही बोनेटमधील जागेचा हटके वापर, व्हिडिओ व्हायरल, पोलीस कारवाईची शक्यता)
पहा व्हिडिओ -
#WATCH | Man Sets Estranged Friend's Luxury Car On Fire During A Wedding In #Gwalior#MadhyaPradesh #MPNews pic.twitter.com/xyNejRIQae
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) February 23, 2024
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेज तपासले. जितेंद्र राठोड आणि सौरभ राठोड या दोन व्यक्तींना आग लागण्यापूर्वी स्कॉर्पिओजवळ पाहण्यात आलं होतं. तथापी, मालवीय यांनी सांगितलं की, मालमत्तेच्या मुद्द्यावरून दोन पक्षांमध्ये सतत वाद सुरू आहे. त्यामुळे जितेंद्र राठोड आणि सौरभ राठोड यांनी स्कॉर्पिओला आग लावली. प्रॉपर्टी डीलरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिकारी सध्या संशयितांचा शोध घेत आहेत.