Viral Propose Video (Photo Credits: Twitter)

आपल्या आवडत्या व्यक्तीला हटके पद्धतीने प्रपोज करण्यासाठी अनेकजण नवनव्या युक्त्या शोधून काढत असतात. त्या व्यक्तीला स्पेशल फिल करण्यासाठी भन्नाट गोष्टी केल्या जातात. अशाच एका हटके प्रपोजचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ट्रेन चालक महिलेला एका तरुणानं चक्क स्टेशनवर प्रपोज केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. प्रपोज करणाऱ्या व्यक्तीचे नाव  Conor O'Sullivan आहे. तर ट्रेन ड्रायव्हर गर्लफ्रेंडचे नाव Paula Carbo Zea असे आहे. हे दोघेही आर्यलँडचे रहिवासी आहेत. (SCG वर भारत-ऑस्ट्रेलिया मॅच दरम्यान भारतीय तरुणाने ऑस्ट्रेलियन तरुणीला केलं प्रपोज, पाहा पुढे काय झालं, Watch Video)

तुम्ही व्हिडिओत पाहू शकाल की, या तरुणाने स्टेशनवर ट्रेन थांबते त्या ठिकाणी माझ्याशी लग्न करशील का? असा बोर्ड लिहिला आहे. तसंच हातात फुलांचा गुच्छ घेत हा तरुण तिथे तरुणीची वाट पाहत आहे. ही तरुणी 13 तासांची शिफ्ट संपवून गाडी स्टेशनवर लावते. ट्रेनचा डोअर उघडून खाली उतरते आणि तिला हे जबरदस्त सरप्राईज मिळते. तरुण तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. Clodagh Maher या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड पसंती देत व्हायरल केला.

पहा व्हिडिओ:

या प्रपोजलमध्ये Conor ने झियाच्या केबिनमध्ये सुद्धा एक छोटा हिडन कॅमेरा ठेवला होता. त्या कॅमेऱ्यातून झियाच्या रिअॅक्शन कॅप्चर केल्या गेल्या. आपल्या प्रपोजलचे ट्विट करत कपलने DART आणि Pearse स्टेशनचे आभार मानले.

हे सर्व पाहून ट्रेन चालक तरुणीही भलतीच खूश होते. त्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात. या भन्नाट प्रपोजचा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चा असून नेटकरी या दोघांनाही शुभेच्छा देत आहेत. हा व्हिडिओ आर्यलँड मधील डब्लिन स्टेशनवरील आहे.