Video: रील बनवण्याच्या व्यसनामुळे अनेक जण आपला जीव धोक्यात घालत आहेत. स्टंटबाजीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका तरुणाची मान मोडण्यापासून वाचली.या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रिव्हर्स जंप करत आहे आणि रिव्हर्स जंप करताना तो तरुण त्याच्या मानेवर पडतो, त्यामुळे त्याची मान ही लचकळी.या स्टंटमध्ये या तरुणाची मान मोडली असती किंवा त्याला जीवही गमवावा लागला असता. सोशल मीडियावर अनेक जण अप्रतिम स्टंट करून लोकांची वाहवा मिळवतात, तर स्टंट करताना अनेकजण जखमीही होतात, असे चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओतही निष्काळजीपणा दिसून येत आहे. हेही वाचा: USA Artistic Swimmers Performs Moonwalk in Pool: यूएसए आर्टिस्टिक स्विमिंग टीमने पूलमध्ये अंडरवॉटर अपसाइड डाऊन मूनवॉक करून सगळ्यांना केले चकित,पाहा व्हिडिओ
View this post on Instagram
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर farukart789 नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आत्तापर्यंत 2.60 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे आणि लोक या व्हिडिओवर जोरदार कमेंट देखील करत आहे.