German Woman Pokes Holes in Partner's Condoms: एका जर्मन महिलेला तिच्या जोडीदाराच्या कंडोम (Condom) ला सुईने छिद्र पाडल्याच्या आरोपाखाली सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. ही महिला तिच्या जोडीदाराचे स्पर्म चोरल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. महिलेला गर्भवती व्हायचे होते, त्यामुळे तिने परवानगी न घेता तिच्या जोडीदाराच्या कंडोमला सुईने छिद्रे पाडले.
पश्चिम जर्मनीतील एका न्यायालयाने कंडोमशी छेडछाड करणे हे चोरी मानले जात असल्याचा निर्णय दिला. Stealthing म्हणजे जेव्हा एक पार्टनर दुसऱ्याला न कळवता सेक्स करताना कंडोम काढतो. न्यायालयाने सांगितले की, 39 वर्षीय महिलेचे तिच्या 42 वर्षीय पुरुष मित्रासोबत शारीरिक संबंध होते. कोर्टात त्यांच्या नात्याचे वर्णन 'फ्रेंड्स विथ बेनिफिट' असे करण्यात आले. ज्यामध्ये मित्रांमध्ये शारीरिक संबंध असले तरी त्यांच्यामध्ये प्रेम नाही. (हेही वाचा - Vegetable-Themed Condoms: व्हेजिटेबल-थीम कंडोममुळे आता सेक्स लाईफचा रोमांच आणखी वाढणार; लवकरच मार्केटमध्ये येणार)
दरम्यान, 2021 पासून दोघे भेटत आहेत. बिलेफेल्डच्या कोर्टाने असे निरीक्षण केले की, स्त्रीने तिच्या जोडीदारावर प्रेम वाढवण्यास सुरुवात केली. परंतु, पुरुषाला अशी भावना नव्हती. या घटनेनंतर, महिलेने तिच्या पार्टनरला मेसेज केला आणि सांगितले की, तिने त्याच्या कंडोमला छेद केला आहे आणि आता ती गर्भवती आहे. परंतु, ही महिला गर्भवती होऊ शकली नाही.
मेसेज वाचून त्या व्यक्तीने तिच्यावर गुन्हा दाखल केला. महिलेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला आपला जोडीदार मिळवायचा असल्याचे तिने कबूल केले. या खटल्याचा निकाल देणारे न्यायाधीश अॅस्ट्रिड सेलेव्स्की म्हणाले, "आम्ही आज ऐतिहासिक निकाल देत आहोत. पुरुष कंडोम काढतो तेव्हा स्टील्थिंग होते. परंतु उलट प्रकरणांमध्ये देखील त्याचा विचार केला जाईल."