अंध व्यक्तीला बसमध्ये चढण्यासाठी धडपड करणार्‍या महिलेचा व्हिडिओ  व्हायरल; अभिनेता रितेश देशमुख सह नेटकर्‍यांनी तिच्या 'कणवे' बद्दल व्यक्त केल्या अशा भावना! (Watch Video)
Woman helps blind man board a bus (Photo Credits: @vijaypnpa_ips Twitter)

आजकाल धकाधकीच्या बनत चाललेल्या जीवनामध्ये माणूसकी हरवत चालली आहे. अशी भावना अनेकदा व्यक्त होते. लोकं आत्मसंकुचित होऊन केवळ त्यांच्या फायद्यासाठी नाते संबंध ठेवतात अशी परिस्थिती असताना सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात 'करूणा, अनुकंपा' सारख्या भावना जीवंत असलेल्या व्यक्ती अस्तित्त्वात आहे याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान सोशल मीडियावर लाल साडीमधील एक महिला अंध व्यक्तीला बस मध्ये चढता यावं म्हणून धावपळ करत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेले नाही. मात्र निस्वार्थी भावनेतून एका अंध व्यक्तीला मदतीसाठी तिने केलेला खटाटोप सध्या इंटरनेटवर अनेकांची मनं जिंकत आहेत. सामान्य नेटकर्‍यांसोबत अभिनेता रितेश देशमुखनेही हा व्हीडिओ शेअर करत त्या महिलेला सलाम केला आहे.

अंध व्यक्तीला मदत करणार्‍या महिलेचा व्हिडिओ Vijayakumar IPS यांनी त्यांचं ट्वीटर हॅन्डल @vijaypnpa_ips वरून शेअर केला होता. त्या व्हीडिओसोबत त्यांनी 'या महिलेने हे जग वास्ताव्याचं एक उत्तम ठिकाण बनवलं आहे. दयाळूपणा हा सुंदर असतो' अशी कॅप्शन दिली होती.

रितेश देशमुखचं ट्वीट

आपण सगळ्यांनी असं व्हायला पाहिजे, जेव्हा आपल्याकडे कुणाचंही लक्ष नसताना देखील! सलाम असं रितेशचं ट्वीट आहे.

अल्पावधीतच या महिलेच्या व्हिडिओवर लाईक्स आणि शेअरच्या प्रचंड संख्येने दाद मिळाली आहे. काहींच्या माहितीनुसार ही महिला केरळ मध्ये एका टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये काम करते.