Fake Messages (File Images)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. पूर्वी केवळ चॅटिंगसाठी वापरण्यात येणारं हे अ‍ॅप आता व्यावसायिक फायद्यांसाठीदेखील वापरले जाते. मेसेजच्या सोबतच आता त्याचा वापर करून व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल करता येतो. मात्र आता हेच अ‍ॅप वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार अशाप्रकारचा मेसेज सध्या झपाट्याने व्हायरल होत आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असल्याने त्याचे जसे फायदे आहेत तसेच दुष्परिणाम देखील आहेत. त्यामुळे कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका.WhatsApp मध्ये दोन नवीन फिचर्स येणार, युजर्सच्या समस्या दूर होणार

व्हॉट्स वापरण्यासाठी खरंच 499 रूपये मोजावे लागणार?

व्हॉट्सअ‍ॅप वर सध्या खोडसाळपणा करण्यासाठी एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लवकरच व्हॉट्सअ‍ॅप रात्री 11 त.30े सकाळी 6 वाजेपर्यंत वापरता येणार नाही. हा मेसेज कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाठवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. असं न केल्यास तुमचं अकाऊंट Invalid समजलं जाईल. त्यानंतर 48 तासामध्ये ते डिलिट होईल. हा मेसेज दुर्लक्षित केल्यास डिलिट झालेलं अकाऊंट पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी 499 रूपये प्रति महिने भरावे लागतील असेही मेसेजमध्ये लिहण्यात आले आहे. तुम्हांला मोफत व्हॉट्सअ‍ॅप वापरायचे असेल तर तुम्हांला सतत चॅतिंग करत रहावे लागेल. किमान दहा जणांचा हा मेसेज पाठवावा लागेल.

शनिवार पासून व्हॉट्सअ‍ॅप सशुल्क सेवा देण्यास सुरूवात करेल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरायला सुरूवात करा. तुमच्या अकाऊंटवर ब्लू टिक आल्यास तुम्ही ते मोफत वापरू शकता.

हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज होतोय व्हायरल 

WhatsApp will be off

From 11.30pm to 6:00 am daily

Declared by central govt.

Message from narendra modi (PM) we

have had an over usage of user names on whatsapp

Messenger. We are requesting all users to forward this

message to their entire contact list. If you do not forward

this message, we will take it as your account is invalid

and it will be deleted within the next 48 hours. DO

NOT ignore my words or whatsapp will no longer

recognise your activation. If you wish to re-activate your

account after it has been deleted, a charge of 499.00 will

be added to your monthly bill. We are also aware of the

issue involving the pictures updates not showing. We are

working diligently at fixing this problem and it will be up

and running as soon as possible. Thank you for your

cooperation from the modi team. WhatsApp is going

to cost you money soon. The only way that it will stay

free is if you are a frequent user i.e. you have at least 50

people you are chatting with. To become a frequent user

send this message to 10 people who receive it (2 ticks)

and your WhatsApp logo will change color.

send this to 8 people to activate the new whatsapp..

Saturday morning whatsapp will become chargeable. If you have at least 10 contacts send them this message. In this way we will see that you are an avid user and your logo will become blue (🔵) and will remain free. (As discussed in the paper today. Whatsapp will cost 0.01€ per message. Send this message to 10 people. When you do the light will turn blue

otherwise whatsapp will activate billing.

ITS TRUE ...... U get blue TICKS

निष्कर्ष

व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत वेबसाईट किंवा इतर यंत्रणांकडून अशाप्रकारची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकारच्या कोणत्याही माध्यमातून अशप्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा मेसेज खोटा असून केवळ खळबळ निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे.