WhatsApp Pay Memes (Photo Credits: @Sarcasticbf/ @TheTarunSharmaa/ Twitter)

व्हॉट्सअॅपने (WhatsApp) नवे पेमेंट (Payment) फिचर अॅड केल्याने अॅप युजर्समध्ये उत्सुकता आहे.  या फिचरमुळे पेमेंट करणे अगदी सोपे झाले आहे. व्हॉट्सअॅप मेसेंजिंग अॅप म्हणून अत्यंत लोकप्रिय आहे. त्यातच या नव्या पेमेंट ऑप्शनमुळे पेटीएम (Paytm), फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay) या मनी ट्रान्सफर अॅपला तगडी फाईट मिळणार आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅप पे मुळे युजर्स भलतेच खूश झाले असून त्यांनी  सोशल मीडिया माध्यमातून व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप पे वरील फनी मीम्स, जोक्स जोरदार व्हायरल होत आहे.

5 नोव्हेंबर रोजी नॅशनल पेमेंट्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) कडून मंजूरी मिळाल्यानंतर देशभरातील युजर्ससाठी व्हॉट्सअॅप पे (WhatsApp Pay) सुरु झाले आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅप अजून एक 'Disappearing Messages' हे नवे फिचर लॉन्च केले आहे. त्यामुळे आता मेसेजचे टाईम लिमिट 7 दिवसच राहणार असून सात दिवसांनंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आपोआपच डिलिट होतील. (WhatsApp Pay म्हणजे काय? या नव्या फिचरचा वापर करुन पैशांची देवाण-घेवाण कशी कराल? जाणून घ्या)

पहा फनी मीम्स आणि जोक्स:

WhatApp Pay कसे वापराल?

UPI प्लॅटफॉर्मवर चालणारे हे फिचर आहे. या फिचरमुळे युजर्संना पैशांची देवाण-घेवाण करणे अगदी सोपे होणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी युजर्संना सर्वप्रथम व्हॉट्सअॅप मेसेंजर अपडेट करावे लागेल आणि त्यानंतर पेमेट ऑप्शन तुम्हाला चॅटमध्ये दिसेल. चॅटमधील attachment बटणवर क्लिक करुन payment ऑप्शन सिलेक्ट करा आणि डेबिट कार्डच्या साहाय्याने UPI Handle क्रिएट करुन युपीआय पीन जनरेट करा. त्यानंतर अगदी सहज तुम्ही तुमच्या कॉन्टॅट लिस्टमधील व्यक्तीला पैसे पाठवू शकता.

व्हॉट्सअॅप पे हे फिचर अॅनरॉईड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही फोन्ससाठी सुरु झाले आहे. त्यासाठी युजर्संना केवळ व्हॉट्सअॅपचे अपडेट करावे लागले.