WhatsApp Down नंतर जगभर युजर्सची सोशलमीडीयात नाराजी सोबतच धम्माल मिम्स, जोक्स; भारतामध्ये सेवा पूर्ववत
WhatsApp Down Funny Memes (Photo Credits: @shubhRLC/ @pubgwala_ladka/ Twitter)

WhatsApp Down झाल्याने मागील काही तासांपासून सोशल मीडीयामध्ये अनेक मीम्स, जोक्स व्हायरल होत आहेत. दरम्यान सध्या भारतामध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सेवा पूर्ववत झाली असली तरीही जगभरात अनेक ठिकाणी युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून मेसेज पाठवणं, मिळवणं यामध्ये अडचण येत आहे. अनेकांनी त्याबद्दल ट्वीटरवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता हळूहळू सेवा पूर्ववत होण्यास सुरूवात झाली आहे. DownDetector या वेबसाईटच्या माहितीनुसार, मागील काही तासांमध्ये युरोप, अमेरिका आणि भारतामध्येही व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना सेवा मिळत नव्हती. दरम्यान अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होण्याच्या घटना अधून मधून होत असल्याचं अनेकदा अनुभवायला मिळालं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज पाहूनच भारतामध्ये अनेकांची सकाळ होत असल्याने विस्कळीत झालेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवेमुळे आता अनेकांनी आपला राग व्यक्त करण्यासोबतच धम्माल मिम्स, जोक्स देखील शेअर केले आहेत.

फेसबूकच्या मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे सुमारे 1.5 बिलियन युजर्स आहेत. त्यामुळे अचानक जेव्हा व्हॉट्सअ‍ॅपची सेवा खंडीत तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसतो. अनेकजण सोशल मीडीयामध्ये त्याबद्दल आपली नाराजी प्रकट करतात.