Twitter (Photo courtesy: Twitter)

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक झाल्यानंतर ट्विटरवर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. वास्तुरचनाकार अन्वय पाटील यांना आत्महत्येस उद्युक्त केल्याप्रकरणी अर्णब यांना बुधवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. त्यावेळी गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला होता. एवढेच नव्हेतर, अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ट्विटरवर हॅशटॅग मुंबई पोलीस (Well Done Mumbai Police) ट्रेन्ड सुरु झाला आहे.

अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले होते. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई पोलीस अटक करण्यासाठी गेले असताना त्यांनी महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ट्विटरवर हॅशटॅग वेलडन मुंबई पोलीस, हॅशटॅग अर्णब गोस्वामी, हॅशटॅग पुछता हैं भारत असे परस्परविरोधी हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. हे देखील वाचा- FIR Registered Against Arnab Goswami: रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप

तसेच गेल्या काही महिन्यांत अर्णबची अनेक वाक्य आणि मीम्स व्हायरल झाली होती. याच वाक्यांचा वापर करून युजर्सने बुधवारी काही नवी मीम्स तयार केली आहेत. ‘मुझे ड्रग दो, मुझे टीआरपी दो, मुझे टेन्शन दो, मुझे बेल दो’ अशा वाक्यांची मीम्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.