फोटो सौजन्य - गुगल

एका महिलेने चोराला साफसफाई करायच्या कपड्यानं धु धु धुतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर  (Social Media) चर्चेचा विषय ठरला आहे. व्हायरल (Viral) होणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ नेदरलॅन्डचा (Netherland) आहे. बेकरीची साफसफाई करताना अचानक एक हुडी घातलेला एक व्यक्ती दुकानात शिरतो आणि कॅश काउंटरजवळ (Cash Counter) येतो. मात्र ही महिला घाबरून न जाता साफसफाईच्या कपड्याने या चोराची धुलाई करते. व्हायरल होणाऱ्या या महिलेचं नावं लतीफ पेकर (Latif Pekar) आहे. तर या व्हिडीओमध्ये ती तिच्या मुलाच्या बेकरीत काम करत असताना हा विचित्र प्रकार घडला आहे. तानसू येगेन (Tansu YEGEN) नावाच्या युवकाने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला असुन आतापर्यंत या व्हिडीओला 1 लाख 28 हजारांहून अधिक व्ह्यूज (Views) मिळाले आहेत.

 

या व्हिडीओत आपण बघू शकतो, काळी हुडी घातलेला एक चोरटा हळूच बेकरीच्या (Bakery) आत शिरतो आणि थेट कॅश काउंटर गाठतो. मात्र हा सगळा प्रकार बघून या बेकरीतील महिला लतीफ घाबरुन जात नाही तर त्या चोरास साफसफाईच्या कपड्याने बेदम मारहाण करते आणि त्याला चोरी करण्यापासून थांबवते. दरम्यान, एक ग्राहक (Coustomer) दुकानात येतो आणि हे पाहून चोरटे घाबरुन पळून जातो. अगदी धुळ साफ करण्याच्या कपड्याने या महिलेने चोराला धुळ चाखवली आहे.

 

नेदरलँडमधील या महिलेने स्वसंरक्षणार्थ क्लिनिंग कापड वापरून चोराची धुलाई केली आहे. फडक्या फटक्याला कमी समजू नका, असं कॅप्शन (Caption) या व्हिडीओला (Video) दिलेलं आहे. चोरट्याची धुलाई करणाऱ्या या धाडसी महिलेचे सोशल मिडीयावर (Social Media) स्तरातून कौतुक होत आहे. तसेच या व्हिडीओला हजारो लाईक्स  (Likes) मिळले असुन कमेंट्सचा (comments) पाऊस पडताना दिसत आहे.