Viral Video: रीलसाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत. असाच एक व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बलिया येथून समोर आला आहे. ज्यामध्ये तीन तरुण फक्त अंडरवेअर घालून, बाईकवर फिरताना आणि बाजारात फिरताना दिसत आहेत. या तिन्ही तरुणांनी केवळ अंडरवेअर परिधान केले असून तिघांनीही हेल्मेट घातलेले आहे. तिघांच्याही गळ्यात रुमाल आहेत. कुठलीही लाज न बाळगता ते तरुण बाजारात फिरत असतात, कधी बाईकवर बसून हिंडत असतात तर कधी दुचाकी ढकलत चालत असतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिलांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ पोलीस कारवाई करण्यात आले आणि या तीन तरुणांविरुद्ध अश्लीलता पसरवण्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच त्याची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. हे देखील वाचा: Mumbai Rabies Eradication Project: बीएमसी कडून 28 सप्टेंबर पासून राबवली जाणार 'रेबिजमुक्त मुंबई' साठी खास लसीकरण मोहिम
अंडरवेअर घालून चालवली बाईक
रील बनाने के लिए युवा आज ऐसी ऐसी हरकतें कर रहे हैं जिसे देखकर एक तरफ तो हंसी आती है दूसरी तरफ गुस्सा भी आता है। ऐसा ही रील बनाने का अजब नजारा बलिया में देखने को मिला है। वीडियो वायरल होते ही तीनों को गिरफ्तार कर लिया गया और बाइक भी सीज कर दी गई है।#ballia #upnews #ViralVideo pic.twitter.com/azGnr4UlMv
— yogesh hindustani (@yogeshhindustan) September 2, 2024
रील्स आणि व्हिडीओ बनवण्याची क्रेझ आता चांगली वाढली आहे. रील बनवण्यासाठी तरुण काहीही करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी, गाड्यांमध्ये, बाजारपेठेत हे तरुण रिले बनवत आहेत. अनेक वेळा रील बनवताना अनेकांना जीव गमवावा लागला. असे असूनही तरुणांचे रील्स बनवण्याबाबतचे वेड कमी होत नाही. या तीन तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यांना जोरदार फटकारत आहेत. @yogeshhindustan या हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.