एक महिला आणि कॅब ड्रायव्हर (Heated Exchange Between Driver and Woman) यांच्यातील वादावातीचा आणि वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओसोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये दोघेही परस्परांशी जोरदार भांडणताना दिसत आहे. सांगितले जात आहे की, प्रवाशी भाड्याच्या पैशांवरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ज्यासाठी केवळ 5 रुपये कारणीभूत ठरले आहेत. व्हिडिओधील संवादावरुन असे लक्षात येते की, बहुदा चालक महिला प्रवाशाकडे भाड्यापोटी 100 रुपयांची मागणी करत आहे. तर,महिला प्रवाशी केवळ 95 रुपयेच देणार म्हणून हट्टाला पेटली आहे. जे की तिला कॅब बुक करतानाच दाखविण्यात आले होते.
व्हिडिओत असेही पाहायला मिळते आहे की, कॅब चालक बुकींग झाल्याप्रमाणे निश्चित ठिकाणी प्रवाशाला सोडण्याच्या विचारात आहे. तर महिला प्रवासी तिने निवडलेल्या ठिकाणावर कॅब चालकाने सोडावे यावर ठाम आहे. त्यामुळे दोघांमध्ये स्थाननिश्चितीवरुन वाद झाला. चालक मोबाईल अॅपवर दाखवत असलेल्या नकाशावरील ठिकाणावर प्रवाशाला सोडण्याबाबत सूचवतो आहे. तर प्रवासी त्याने निवडलेल्या ठिकाणी सोडण्याचा आग्रह करतो आहे. दोघांच्या संवादामध्ये चालक गाडी अधिक फिरली तर पैसेही अधिक द्यावे लागतील असे सांगताना दिसतो आहे. (हेही वाचा, Viral Video: शाळेच्या गेटसमोरच मुलींमंध्ये हाणामारी (पाहा व्हिडिओ))
दरम्यान, ड्रायव्हर InDrive कंपनीशी संबंधित असल्याचे समजते. तसेच, चालकाने प्रवाशासोबत घातलेल्ला हुज्जतीबद्दल कंपनीने दिलगिरीही व्यक्त केली आहे. तसेच, प्रवाशांची सुरक्षा आणि आरामदायी प्रवास यांसाठी कंपनी कटीबद्ध असल्याचेही कंपनीने म्हटल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ आतापर्यंत 2.3 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांनी पाहिला आहे.
व्हिडिओ
View this post on Instagram
दरम्यान, व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका एका वापरकर्त्याने महिलेच्या भूमिकेवर टीका करताना म्हटले, "कार पाण्यावर चालत नाही, बाईबरोबर भांडणे थांबवा, असे वागू नका," असे म्हणत दुसर्याने कंपीनीने चालक आणि भाड्यात पारदर्शकता आणि काहींच्या अयोग्य वर्तनाच्या व्यापक समस्येकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. आणखी एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, "प्रश्न पैशाबद्दल नाही तर अयोग्य वर्तनाबद्दल आहे".