Viral video: लग्नात फोटोग्राफरला पतीने फटकारल्यानंतर लोटपोट हसणार्‍या नववधू चा वायरल व्हिडिओ सोशल मीडियात तुफान गाजला; आता जाणून 'त्या' प्रसंगामागील खरी कहाणी
Viral Video Of Bride Laughing Hysterically Onstage | Photo Credits: Twitter

सोशल मीडियामध्ये मागील काही दिवसामध्ये एक वेडिंग फोटोग्राफीच्या धम्माल व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. यामध्ये पती नववधूचे जवळून फोटो काढणार्‍या फोटोग्राफरच्या कानशिलात लगावतो आणि वधू स्टेजवरच लोटपोट हसते. अवघ्या 45 सेकंदाचा हा व्हिडिओ मागील आठवड्यात ट्वीटर वर शेअर करण्यात आला आणि बघता बघता लाखो लोकांना हसवून गेला. पण या व्हिडीओमध्ये नववधू स्टेजवरच हसून हसून लोटपोट होते हे पाहून अनेकांना ती खरंच हसत होती की हा प्रॅन्क होता असा प्रश्न पडला होता. दरम्यान तुम्हांलाही असंच वाटत असेल तर जाणून घ्या या तुफान वायरल व्हिडिओमागची खरी कहाणी काय आहे.

खरंतर हा व्हिडिओ सुरू होतो तेव्हा नववधू आणि वर स्टेजवर फोटो क्लिक करून घेत असतात. पण खरी कहाणी सुरु होते तेव्हा जेव्हा नववधूचं सोलो फोटोशूट सुरू होतं. जेव्हा फोटोग्राफर नववधूचा चेहरा फोटोसाठी अ‍ॅडजस्ट करण्यासाठी तिला हात लावतो तेव्हा मात्र नवरदेवाचा पारा चढतो. तो चक्क फोटोग्राफरच्याच कानशिलात लगावतो आणि त्याला तेथून जाण्यास सांगतो. या प्रसंगानंतर फोटोग्राफर जरा बुचकळ्यात पडतो पण नववधूला मात्र तिचं लपवता येत नाही. ती हसून हसून स्टेजवरच लोटपोट होते.

Renuka Mohan ने हा व्हिडिओ ट्वीट करत मला ही नववधू आवडली असं ट्वीट केलं आहे. हा व्हिडिओ ट्वीटर वर आल्यापासून तुफान गाजला आहे. 16 हजारांपेक्षा जास्त रिट्वीट्स आणि 9 लाख व्ह्यूज या व्हिडिओला मिळाल्या आहेत. दरम्यान हा व्हिडिओ खरा आहे की प्रॅन्क हे माहित नाही असं तिनं ट्वीट केल्यानंतर खुद्द 'नवराई' नेच त्यावर खुलासा केला आहे.

 

Anikriti Chowhan ही उमदी छत्तीसगडची अभिनेत्री हीने हा व्हिडिओ तिच्या चित्रपटाच्या शूटिंगचा असल्याचं म्हटलं आहे. हा सीन तिचा सिनेमा 'डार्लिंग़ प्यार झुकता नही' सिनेमामधील असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. तसेच मोहनचं देखील हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल आणि त्याला मिळत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मानले आहेत.

ट्वीटर वर Anikriti Chowhan ने अनेक अभिनंदनपर मेसेजेसला उत्तर देताना तिने हे स्पष्ट देखील केलं आहे की त्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकलेली नाही. सारा व्हिडिओ केवळ प्रोजेक्टचा भाग आहे.