करायला गेले एक आणि झाले भलतेच', 'केले तुका झाले मका' किंवा 'दुसऱ्याचे वाईट चिंतले की आपलेच वाईट होते', अशा आशयाच्या म्हणी आपण अनेकदा ऐकतो. असाच काहीसा प्रकार एका तरुणीच्या बाबतीत घडला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या तरुणीसोबत ही घटना घडली आहे. आपण ही घटना व्हिडओत पाहू शकता. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी 'चुकीला माफी नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या एका तरुणीने तिच्या शेजारी असलेल्या दुचाकीस्वाराला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. परंतू, असे करणे तिच्या अंगलट आले. कारण तिचा पाय दुचाकीपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे दुसऱ्याला लाथ मारता मारता तिचाच तोल जातो आणि ती दुचाकीवरुन खाली पडते. गंमत म्हणजे ती ज्या दुचाकीवर बसली आहे ती दुचाकी मात्र पुढे जाते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडिओ सुरुवातीला पाहायला मिळते की, एक पुरुष आणि महिला गुलाबी दुचाकीवरुन निघाले होते. त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती दुचाकी चालवताना दिसत आहे. दरम्यान, ती महिला दुसऱ्या दुचाकीवरील व्यक्तीला लाथ मारण्यासाठी पुढे जाते, मात्र, तिचा तोल सुटला आणि ती रस्त्यावर पडली. गुलाबी बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला हे समजत नाही की ती महिला पडली आहे त्यामुळे तो पुढे जातो. दरम्यान, त्याच्या लक्षात येते आणि तो काही सेकंदांनंतर थांबतो. हेही वाचा Viral Video: कुंपणचं शेत खातयं! रेल्वे स्थानकांवरील अधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांची मोठी फसणूक, पहा व्हिडीओ
व्हिडिओ
Reddit वर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, "कोण म्हणाले की कर्म खरे नाही." दुसर्या युजरने लिहिले, "हाहाहा हाहा तिला जे हवे होते ते मिळाले." तिसरा वापरकर्ता म्हणतो, "झटपट कर्म".