Viral Video: मिठाईच्या दुकानात कुत्र्याने घातला धुडगूस, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट
Street Dogs Representative Image (Photo Credits-Facebook)

रस्त्यांवरच्या भटक्या कुत्र्यांपासून (Dog) जरा लांबच राहिलेले बरे असे सल्ले बरीच लोक देताना दिसतात. त्यांच्या भुंकण्याने तसेच कधी ते पिसाळलेले असतील तर त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. तसाच काहीसा त्रास सहन करावा लागलाय तो एका मिठाईवाल्याला... मिठाई खाण्याचा मोह लहानांपासून ज्येष्ठ व्यक्तींनाही होतो. मात्र जेव्हा हा मोह एका कुत्र्याला होतो तेव्हा काय होते हे जर तुम्ही पाहिलात तर तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा एका मिठाईवाल्याचा दुकानातील (Sweet Shop) काचेत ठेवलेल्या मिठाईच्या कपाटात शिरून जे काही कारनामे करत ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.

हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला दिसेल एक कुत्रा अचानक एका मिठाईच्या दुकानात शिरतो. तो काहीतरी खाण्याचा शोधात आहे. जेव्हा त्याला कळते त्याचे मिठाईचे काउंटर खुले आहे तसा तो त्याच्या आत शिरतो. कुत्र्याचा हा प्रकार पाहून दुकान मालकही गडबडतो.हेदेखील वाचा-सिंहाचं ही कनवाळू रूप; पहा बदकाच्या पिल्लासोबत खेळणार्‍या जंगलाचा राजाचा हृद्यस्पर्शी व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Minda Bai (@minda_bai)

दुकानदाराच्या हे लक्षात येताच तो कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. परंतू त्याला आपल्याकडे येतानाचे पाहून कुत्रा घाबरतो आणि तो आतच सैरावैरा फिरु लागते. यामुळे त्याच्या दुकानातील मिठाई खराब होते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हसून लोटपोट व्हाल. हा व्हिडिओ पोस्ट करणा-याने स्टेटसमध्ये लिहिले आहे, "हे मिठाईचे दुकान आहे आणि हा कुत्रा आहे आणि हा मिठाईवाला त्याला पळवून लावत आहे." हा व्हिडिओ 7,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. काहींनी या व्हिडिओला 'कुत्र्याची पावरी होत आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे.