व्हिएतनाम मध्ये तरुणाने चक्क हातावर गोंदवला आय डी कार्ड टॅटू, कारण वाचून थक्क व्हाल
Tattoos ID Card (Photo Credits: Twitter)

व्हिएतनाममध्ये (Vietnam) एका तरुणाने चक्क हातावर त्याचं नॅशनल आय डी कार्ड टॅटूच्या ( ID card tattoo) स्वरूपात गोंदवल्याचा फोटो व्हायरल होत आहे. सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत असलेल्या हा फोटो ज्या व्यक्तीने टाकला आहे त्याने लिहलेल्या पोस्टनुसार, माझा मित्र ड्रिंक्ससाठी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अनेकदा त्याच्या वयाचा पुरावा दाखवण्यासाठी आवश्यक आय कार्ड तो घरी विसरलेला असतो. नाईटक्लबमध्ये प्रवेश मिळावा म्हणून आता त्याने चक्क आयकार्ड हातावर गोंदवून घेतलं आहे. व्हिएतनाममधील या अजब टॅटूची सध्या सोशल मीडियामध्ये चर्चा आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली म्हणून तरूणाने पाठीवर गोंदवला तिरंगा आणि 71 शहिदांची नावं

अनेकदा आवडीच्या व्यक्तीचं नाव, फोटो, चिन्ह टॅटूच्या स्वरूपात काढलेलं तुम्ही पाहिलं असेल पण अशाप्रकारचा आयडी पाहून थक्क झाला असाल नक्की. या टॅटू काढणाऱ्या आर्टिस्टनेदेखील सुरुवातीला या तरुणाला नकार दिला होता. पण तो काही केल्या जाईना हे पाहिल्यावर अखेर नाईलाजास्तव टॅटू आर्टिस्टलाही तो गोंदवून घ्यावाच लागला. हो-चि-मिन्हचा (Ho Chi Minh City) या शहरातील ही घटना आहे.