Credit-(X,@JantantraTv)

VIDEO: उत्तर प्रदेशातील झाशीच्या नवाबाद मधून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात पतीला प्रेयसीसोबत पाहून पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने पतीला जोरदार मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या दरम्यान पत्नी खूप गदारोळ करते आणि नवऱ्यावर रागावते, यावेळी ती रागाच्या भरात नवऱ्याला थप्पडही मारते. या व्यक्तीसोबत आणखी एक तरुणी आहे.पत्नीने पतीला रंगेहाथ पकडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती अनेक दिवसांपासून घरातून बेपत्ता होता आणि पत्नी सतत पत्नीचा पाठलाग करत होती. यावेळी पत्नीने आपल्या पतीला बीकेडी चौकात दुसऱ्या महिलेसोबत पाहताच महिला संतप्त झाली. सोशल मीडिया एक्सवर @JantantraTv नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पत्नीने पतीला केली मारहाण

अनेक दिवसांपासून पती घरातून गायब होता, पत्नीला पतीवर संशय आला, दोघांना पत्नीने रंगेहाथ पकडले, पतीने स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली, तेव्हा संतापलेल्या महिलेने यावेळी पतीला मारहाण केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

पोलीसही घटनास्थळी दाखल

बराच वेळ नवरा-बायकोमध्ये भरलेल्या चौकात गदारोळ सुरू होता. अखेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना वेगळे करून प्रकरण शांत केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.