UP Doc Gives Fake Samples For Covid-19 Test Target: कोविड19 चाचणीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एका डॉक्टराने चक्क स्वत:चेच 15 नमुने तपासणीसाठी पाठवले; पाहा संपूर्ण व्हिडिओ

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाय योजना आखल्या जात आहेत. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व राज्य सरकारने आपापल्या राज्यातील डॉक्टरांसमोर कोरोना चाचणी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने (UP Government) दिलेल्या कोविड19 चाचणीचे लक्ष्य पूर्ण न झाल्याने मथुरा (Mathura) येथील एका डॉक्टराने चक्क स्वत:चेच 15 नमुने (Fake Samples) तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने याप्रकरणाची दखल घेतली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ मथुरा येथील बलदेव परिसरातील स्वर्गीय डोरीलाल अग्रवाल सामुदायिक आरोग्य केंद्रातील आहे. या व्हिडिओत डॉ. राजकुमार सारस्वत स्वत:चेच नमुने घेताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यासमोर ठेवलेले कोविड चाचणीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांना नमुने कमी पडले आहेत. तसेच हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ते स्वत:चे नमुने घेत असल्याचे त्यांनी स्वत: या व्हिडिओत सांगितले आहे. यासाठी त्यांनी स्वत:चे तब्बल 15 नमुने घेतले आहेत. या सर्व प्रकारामुळे नोकरी गमवण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने त्यांना जाणीव करून दिली. मात्र, तरीदेखील डॉ. राजकुमार हे थांबले नाहीत. हे देखील वाचा- Coronavirus Recovery Rate in India: भारतात सलग 2 दिवस 94,000 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 79.68%- आरोग्य मंत्रालय

पाहा संपूर्ण व्हिडिओ-

भारतात गेल्या 24 तासात आणखी 86 हजार 961 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 लाख 87 हजार 581 वर पोहचला आहे. यापैकी 43 लाख 96 हजार 399 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 87 हजार 882 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण देशात 10 लाख 3 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, जगभरात कोरोनामुक्त रुग्णांच्या यादीत भारत अव्वल स्थानावर आहे.